सरदार वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई,दि: 31 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एकता, अखंडता सुरक्षा अबाधित राखण्यासाठी  शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय तसेच मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सरदार वल्लभभाई पटेल आणि  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा