सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचा देशाच्या विकासात वाटा - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसमाज भवनाचे  थाटात लोकार्पण
नागपूर, दि.31 :  सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने एकतेचा परीचय देत उभारलेले वातानुकूलित भवन नागपूरच्या सौदर्यांत भर टाकणारे असून या भवनाचा उपयोग लेवा पटेल समाजासोबतच इतर समाजालाही विविध कार्यक्रमासाठी उपयोग होईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

बेसा येथे सौराष्ट्र लेवा समाज यांच्या वतीने  आठ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सौराष्ट्र लेवा पटेल भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून झाले. याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार गोपालदास अग्रवाल, गुजरातचे आमदार प्रफुल्लभाई पानशिरोया पटेल,  गुजरात पटेल समाजाचे सुरेशभाई पटेल, रसिकभाई आकेलीया, बेसाचे संरपंच शालिनी कंगाले, मुंबई सौराष्ट्र समाजाचे अनंतराही काकडीया नगरसेवक संदीप जोशी, उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या समाजाबरोबर इतरांनाही ही वास्तू विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सौराष्ट्र लेवा पटेल समाजाबरोबर आपले जुने स्नेहाचे संबंध असून त्यांनी आयेाजित केलेल्या नवरात्र असो किंवा इतर कार्यक्रमांना आपण जात असतो. या समाजाने देशाला व महाराष्ट्राला व्यापार, उद्योग, बांधकाम, कर यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, लेवा पटेल समाज  राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर असतो.  जलयुक्त शिवार कार्यक्रमास त्यांनी मोठया प्रमाणात आर्थिक सहभाग नोंदविला आहे.
  
यावेळी सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे सुरेशभाई पटेल, प्रवीण पटेल, सुदेश पटेल यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांचा धनादेश जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. प्रारंभी सौराष्ट्र लेवा पटेल समाजाच्या वतीने मुख्यमंत्री व प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा