कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथील नागरी सुविधांची कामे जलद गतीने करावीत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

0
47

मुंबई, दि. १० : चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मदत व  पुनर्वसन मंत्री  अनिल पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी आणि कोंढण येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, उपसचिव (पुनर्वसन) श्रीनिवास कोतवाल, कोकण विभागाच्या पुनर्वसन उपायुक्त  रिता मेगेवार, रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी श्री.बर्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) एम.बी.बोरकुट यासह कोळकेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, कोळकेवाडी येथील नागरी सुविधा पुरविणे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे नव्याने जागा मागण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. कोंढण ता. संगमेश्वर येथे भूस्खलनामध्ये घरांना नुकसान झालेल्या ग्रामस्थांचे त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन होण्याबाबतची मागणी लक्षात घेता याबाबत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here